एचडीएफसी बँकेमधून बोलतोय असे सांगून 47,498 रुपयांना गंडा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

एचडीएफसी बँकेतून बोलतोय तुमचे बँक खाते बंद झाले आहे. ते चालू करण्यासाठी तुमच्या एटीएमचा 16 अंकी क्रमांक आणि सीव्हीसी क्रमांक द्या अशी मागणी करुन अज्ञात भामट्याने 47,498 रुपयांना गंडा घातला. या फसवणूकीचा गुन्हा चिपळूण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

रहिमा मुकादम, वय 37, रहाणार गोवळकोट, चिपळूण यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास रहिमा मुकादम यांच्या मोबाईलवर एक फोन आला. आपण एचडीएफसी बँकेतून बोलतोय असे सांगून तुमचे बंद पडलेले खाते चालू करण्यासाठी एटीएमचा 16 अंकी क्रमांक आणि सीव्हीसी क्रमांक आणि मोबाईलला आलेला पासवर्ड मागून घेतला आणि 47,498 रुपयांना गंडा घातला.