मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

1600

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्सअॅपवर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. या मेसेजमध्ये, मी मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देणार आहे, असं लिहिलं होतं. त्यानंतर एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करून पुढे योगी त्यांचे कट्टर शत्रु असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणी मुंबई दहशवादी विरोधी पथकाने आरोपीला अटक करून उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या हवाली केले होते. तसेच सदर आरोपीचा ताबाही मुंबई पोलिसांनी मागितला आहे.

या आरोपीला सोडून द्या अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असाही एक संदेश उत्तर प्रदेशच्या हेल्प डेस्कवर आला होता. सदर व्यक्ती नाशिकचा रहिवासी आहे हे कळल्यानंतर नाशिकहून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडे ताब्यात दिले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या