फेसबुकवर बुक करा चित्रपटाची तिकिटे, रिमाइंडरही नोटीफिकेशनद्वारे मिळणार

140

फेसबुककर आता चित्रपटाची तिकिटे काढता येणार आहेत. तसेच एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर आवडल्यास तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो पाहण्याचे रिमाइंडरही नोटीफिकेशनद्वारे मिळणार आहे. फेसबुकने हो दोन्ही फिचर्स अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लाँच केले असून लवकरच ते हिंदुस्थानातही लाँच होणार आहेत.

आतापर्यंत फेसबुककर चित्रपटांच्या जाहिराती, ट्रेलर्स पाहता येत होते, मात्र यापुढे विविध थिएटरमधील शोच्या वेळादेखील कळणार आहेत. चित्रपटाच्या जाहिरातीकर क्लिक करून गेट शो टाइम्स ऑप्शनवर क्लिक केल्यास शोच्या वेळा जाणून घेता येतील तसेच त्या शोचे तिकीटही काढता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या