अॅसिडहल्ला पिडीतांनीही साजरी केली होळी

फोटो-ANI

सामना ऑनलाईन । मुंबई
होळीच्या रंगामध्ये न्हाऊन निघण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. अॅसिड हल्ल्यामुळे चेहरा भाजलेल्या महिलांनाही होळी खेळायचा मोह आवरला नाही. जुने दिवस आठवत अॅसिड हल्ला पिडीत महिलांनी मुंबईमध्ये होळी खेळली. मात्र होळी खेळत असताना त्यांनी समाजभान जपत नैसर्गिक रंगांचाच वापर केला आणि सगळ्यांनीच नैसर्गिक रंगांचा वापर करावा अशी विनंती केली.

 

एकतर्फी प्रेम आणि सुड भावनेनं अनेक स्त्रीयांच्या अंगावर अॅसिडहल्ला केल्याचं आपण एैकलं असेल. क्षुल्लक कारणास्तव स्त्रीला चेहरा खराब करण्याची धमकी दिली जाते. या धमक्यांमुळे अनेक वेळा स्त्रीयांना दिवसा किंवा रात्री एकटं बाहेर जाण्याची भिती वाटते. महिलांना माघार घेण्यासाठी अनेक वेळा अॅसिड हल्ल्याची धमकीही दिली जाते. अॅसिडहल्ल्यात झालेल्या जखमांवर उपचार शक्य असले तरी त्याच्या खुणा जन्मभर सोबत राहू शकतात. या डागांमुळे स्त्रीयांना जगणंही मुश्किल वाटतं. याच अनुषंगानं अनेक संस्था मोठ्या प्रमाणावर जणजागृती करताना दिसत आहेत.

होळीला वाईट गोष्टींचं दहन करण्याची प्रथा आहे. होळीला रंगांची मुक्तपणे उधळणही करण्यात येते. प्रत्येकजण या रंगात न्हाऊन काढणाऱ्या सणाचा आनंद लुटच असतो. याच अनुषंगानं आज मुंबईत अॅसिडहल्ल्यात जखमी झालेल्या महिलांनी रंगांची उधळण करत होळीचा सण आनंदानं साजरा केला.