अवैध बांधकामामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पद रद्द

17

सामना ऑनलाईन, सांगली

अवैध बांधकाम केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेचे पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हाधिकारी विजय काळम -पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. भाजपाचे स्थानिक नेते अनिल कुट्टे यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाटील यांचं नगरसेविका पद्द रद्द करण्याचा आदेश दिला. राष्ट्रवादी काँग्रेस या निर्णयामुळे संतापली असून हा निर्णय राजकीय सूडबुद्धीने घेतल्याचा आरोप त्यांच्या नेत्यांनी केला आहे. या आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्याचे शहराध्यक्ष अमोल शिंदे यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या