संप करणार्‍या मेडिकल स्टोअर्स विरोधात मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी

55

सामना ऑनलाईन । पेण

एआयओसीडी या औषध संघटनेने दिनांक ३० मे २०१७ रोजी देशव्यापी संप करण्याचे निर्देश देशभरातल्या मेडिकल स्टोर्सना दिले आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने याबाबतीत तीव्र आक्षेप घेऊन सदर संपामध्ये सहभागी होणाऱ्या मेडिकल स्टोर्स विरोधात मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देशभरातल्या नागरिकांना वेठीस ठेऊन सार्वजनिक आरोग्याला धोक्यात टाकून संप करणे ही घटनाविरोधी बाब असल्याचे मत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे . तसेच सदर संप मागे घेण्यास ठोस पावले उचलण्याची विनंती ही पत्रात केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुनीरभाई तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.वेद तिवारी, कायदेशीर सल्लागार अमित राणे यांनी सदर पत्र देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या