सोलापुरात फ्रुटबिअर बनवणाऱ्या कारखान्यावर धाड

सामना ऑनलाईन, सोलापूर

बनावट बिअर बनवणाऱ्या एका कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली. विशेष बाब म्हणजे हा कारखाना सोलापूर शहरातच आहे. सोलापूरमधल्या कोरचिकोरवे नगरात श्रीस्टार ड्रिंक्स नावाचा कारखाना आहे. याच कारखान्यावर ही धाड टाकण्यात आली.

fruit-beer-action

या कारखान्यामध्ये भेसळयुक्त माल वापरून फ्रुटबिअर बनवण्यात येत होती. याबाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती, ज्यामुळे हा छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये लाखो रूपयांचा माल जप्त करण्यात आला. ज्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे तो कारखाना परवानाधारक आहे मात्र जो माल फ्रुटबिअर बनवण्यासाठी वापरला जातो त्यामध्ये भेसळ केली जात असल्याचं संशय आहे.