दिलदार सेहवागचा ‘त्या’ मृत तरुणाच्या आईला मदतीचा चेक

12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग मैदानावरील विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल जात असला तरी मैदानाबाहेर आपल्या दिलदार स्वभावाची त्याने छाप पाडली आहे. केरळमध्ये तांदूळ चोरल्याप्रकरणी मधू कडुकुमन्ना (२७) नावाच्या तरुणाला जमावाने मारहाण केली होती. या मारहाणीत मधूचा मृत्यू झाला होता. या तरुणाच्या आईला सेहवागने दीड लाख रुपयांचा मदतीचा चेक पाठवला असून सामाजिक कार्यकर्ते राहुल इस्वर यांनी ही माहिती दिली आहे. हा चेक ११ एप्रिलपर्यंत मधूच्या आईला सोपवण्यात येईल असेही राहुल यांनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

सोशल मीडियावर उठले होते रान
मधूच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. सेहवागनेही ट्वीट करत या प्रकरणात उडी घेतली होती. या ट्वीटमध्ये सेहवागने मुसलमान समाजाच्या तरुणांवर आरोप केले होते. त्यानतंर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले होते.

काय आहे प्रकरण?
मधू आदिवासी भागात राहत होता. लोकांनी मधूवर तांदुळ चोरल्याचा आरोप केला होता. चोरीच्या आरोपानंतर लोकांनी त्याला लाढ्या-काढ्यांनी मारहाण केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी मधूला पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच मधूचा पोलिसांच्या गाडीतच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या