अभिनेता अर्जुन रामपालच्या डोळ्याला दुखापत

42

मुंबई-अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या ‘डॅडी’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला. त्याच्या डोळ्याला दुखापत झाली असून सध्या त्याच्या डोळ्याभोवती बँडेजही बांधण्यात आले आहे.

आपल्या चाहत्यांंना अर्जुनने ट्विटरवरून या घटनेबाबत माहिती दिली. तसेच आपण किरकोळ जखमी असून लवकरच पुन्हा चित्रीकरणासाठी उभे राहू, असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला. या ४४ वर्षीय अभिनेत्याचा नुकताच अभिनेत्री विद्या बालनबरोबरचा ‘कहानी-२’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या तो अरुण गवळी ही गँगस्टर ते राजकारणी असा जीवनप्रवास असणारी मुख्य व्यक्तिरेखा ‘डॅडी’ या चित्रपटात साकारत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या