अभिनेत्री कंगणा रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, पश्चिम बंगाल हिंसाचारावर केले होते ट्विट

अभिनेत्री कंगणा रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर कंगणाने एका मागोमाग एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये कंगणाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते.

कंगणाने ट्विट करून म्हटले होते की मी ममता बॅनर्जी यांना रावण म्हटले होते. पण रावणाने एक साम्राज्य उभे केले होते, तो एक चांगला शासक होता, उत्तम वीणावादक होता. परंतु ममता बॅनर्जी या रक्तपिपासू राक्षसीण आहेत. ज्यांनी ज्यांनी ममता बॅनर्जी यांना मत दिले आहे त्यांचे हात रक्ताने माखले आहेत असे कंगणाने ट्विट केले होते.

kangana-account-suspended

तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर हिंसाचार झाला. या हिंसेचे खापर कंगणाने तृणमूल काँग्रेसवर फोडले आहे. एक व्हिडीओ पोस्ट करून कंगणाने म्हटले आहे की तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यानंतर अनेक युजरने कंगणाला ट्रोल केले. या सगळ्या घडामोडीनंतर ट्विटरने कंगणाचे अकाऊंटच सस्पेंड केले. कंगणाचे ट्विटर अकाऊंटर सस्पेंड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वादग्रस्त विधान केल्यामुळे कंगणाचे ट्विटर अकाऊंटर सस्पेंड करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या