अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी

828

प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रकाश राज यांनी धमकीचे पत्र त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे. या पत्रात त्यांच्यासोबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी व माकप नेत्या ब्रिंदा खरात यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हे पत्र त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थकांकडून आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रकाश राज यांना एक निनावी पत्र आले असून त्यात येत्या 29 जानेवारीच्या मुहुर्तापासून देशद्रोह्यांचा खात्मा करण्यात येणार आहे. या पत्रात प्रकाश राज, बिंद्रा खरात, एचडी कुमार स्वामी, निजागुनंदा स्वामीजी यांच्याव्यतिरिक्त आणखी 11 जणांचा देशद्रोही असा उल्लेख केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या