राजकुमार रावच्या ‘छलांग’चे पोस्टर्स प्रदर्शित, पाहा त्याचा नवा लूक

603

वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता राजकुमार राव हा लवकरच आपल्याला एका क्रिडा शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा आगामी चित्रपट छलांगमध्ये तो ही भूमिका साकारणार असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर शुक्रवारी रिलीज झाले आहे. राजकुमार रावने या सिनेमाचे पोस्टर आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे.

या पोस्टरमध्ये राजकुमार राव हा थकून भागून झोपलेला दिसत आहे. त्याच्या डोक्याखाली उशी म्हणून त्याने फुटबॉल घेतला असून त्याचे विद्यार्थी फार आशेने त्याच्याकडे पाहात आहेत. या पोस्टरमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा देखील असून ती देखील नेहमी पेक्षा वेगळ्या अवतारात पाहायला मिळत आहे. हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेल्या नुसरतने यात पंजाबी ड्रेस घातला आहे. हे पोस्टर शेअर करताना राजकुमारने त्यासोबत ‘मोठी झेप घेण्यासाठी, मोठी झोप घेणे गरजेचे आहे’ असे कॅप्शनही दिले आहे.

‘शाहिद’, ‘सिटीलाइट’, ‘अलीगढ’, ‘ओमेर्ता’ या सिनेमानंतर हन्सल मेहता आणि राजकुमार राव पुन्हा एकदा सोबत येत आहे. या सिनेमात मोहम्मद जीशान अयूबनेही महत्वाची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 13 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या