अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवासाची शिक्षा

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादव याला कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजीव सहाय एंडलो यांनी सुनावली आहे. राजपालची रवानगी तिहार तुरुंगात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

राजपालच्या श्री नवरंग गोदावरी एंटरटेनमेंटने दिल्लीच्या मुरली प्रोजेक्ट्सकडून चित्रपट निर्मितीसाठी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2010 मध्ये हे घेतलेले कर्ज आतापर्यंत फेडू न शकल्याने कर्जदात्या मुरली प्रोजेक्टसने राजपालविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दावा ठोकला होता.राजपालने आपल्या “अता पता लापता” या पदार्पणीय हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी हे मोठे कर्ज घेतले होते.

आपली प्रतिक्रिया द्या