लॉकडाऊन काळात अभिनेत्याच्या पत्नीची डिलिव्हरी, सांगितला भयंकर किस्सा

4707

कोरोना व्हायरसमुळे देशभरात 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक गरोदर महिलांची या लॉकडाऊनच्या काळात प्रसूती होत असून त्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच एक प्रकार बालिका वधू फेम अभिनेता रुसलान मुमताज सोबत घडला आहे.

माझी पत्नी निरालीच प्रसूती लॉकडाऊन नंतर तीन दिवसांनी म्हणजे 26 मार्चला झाली. मात्र प्रसूती नंतर काही दुसऱ्याच दिवशी त्या रुग्णालयात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने आम्हाला ते रुग्णालय सोडायला सांगितले. कोरोनाचा रुग्ण ऐकून आम्ही घाबरलोच. आपल्या चिमुकल्याला घेऊन घर गाठले. मात्र आम्हाला बाळाला कसे सांभाळायचे. काहीच माहित नव्हते. आमचे नातेवाईक देखील लॉकडाऊनमुळे येऊ शकत नव्हते. आम्ही एक कामासाठी एक बाई ठेवणार होतो. मात्र कोरोनामुळे ते देखील शक्य नव्हते. त्यामुळे घरातली कामं व मुलाला सांभाळणं सगळं आम्ही दोघंच करत होतो, असे रुसलानने सांगितले.

त्या दरम्यान रुसलानने त्यांच्यासोबत घडलेला एक भयंकर प्रकार देखील सांगितला. ‘रुग्णालयातून तातडीने निघून आाल्यामुळे आम्हाला मुलाला कसं बांधायचं वगैरे माहित नव्हतं. आम्ही युट्यूबवर बघून बाळाला फडक्यात बांधलं. मात्र काही वेळाने माझ्या लक्षात आलं की आमचं बाळ हलतच नाही. आम्ही दोघंही खूप घाबरलो. त्याला हलवायचा प्रयत्न केला. तरिही त्याने डोळे खोलले नाही. निराली तर रडवेली झालेली.मात्र थोड्याच वेळात त्याने रडायला सुरुवात केली. ते बघून आमच्या दोघांचा जीव भांड्यात पडला’, असे रुसलानने एका मुलाखतीत सांगितले आहे. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या