संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार लग्नबंधनात? सोशल मिडिया पोस्टमुळे रंगली भलतीच चर्चा

संतोष जुवेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ‘मोरया’ आणि ‘झेंडा’ चित्रपटातून त्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तो सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अशातच नुकताच तो एका स्पेशल कारणामुळे चर्चेत आला होता. संतोषने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे तो लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

संतोष जुवेकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, मित्रांनो अचानक खूप मोठी आणि खूपच आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडतेय जिची मी आतुरतेनं वाट पाहत होतो. ‘ती’ माझ्या आयुष्यात आलीये..’ या पोस्ट नंतर ‘ती’ कोण आहे? कशी दिसते? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर संतोषने सोशल मिडियाच्याच माध्यमातून तिचा उलगडा केला आहे. संतोषला जिच्याबद्दल सांगायचं होत ती म्हणजे त्याची नवीन फिल्म असून त्याच्या नवीन चित्रपटाचं नाव ‘३६ गुण’ असं आहे. लग्न जुळवताना ‘३६ गुण’ पाहिले जातात. दोघांमध्ये भांडण किंवा वाद असेल तेव्हा दोनजणांमध्ये ‘३६’ चा आकडा असल्याच म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकडयाने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठीच त्याने पोस्ट टाकली आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे. समित काक्कड दिग्दर्शित हा चित्रपट ४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. संतोष जुवेकरच्या या नव्या चित्रपटासाठी चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.