प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीला किस करतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले ‘शरम करो’

प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी ही नुकतीच आई झाली आहे. अनिता व रोहीत रेड्डी यांना मुलगा झाला असून ते कायम मुलासोबतचे क्यूट फोटो शेअर करत असतात. तसेच ते एकमेकांसोबतचे देखील फोटो शेअर करत असतात.

मात्र यावेळेस अनिताच्या नवऱ्याने त्याचा किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा खासगी क्षणांचा फोटो सोशल मीडियावर टाकणे तिच्या चाहत्यांना आवडले नसून त्यांनी ‘जरातरी लाज बाळगा’ असा सल्लाच या जोडप्याला दिला आहे. या फोटोवरून ते दोघेही मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.


रोहित रेड्डीच्या प्रोफाईलवरून शेअर झालेल्या या फोटोवर अनेकांनी ‘शर्म करो’ अशा कमेंट दिल्या आहेत. तर काहिंनी हे असे खासगी क्षण का म्हणून जगासमोर पोस्ट करायचे असा प्रश्न त्या दोघांना केला आहे.

‘नागिन’ फेम अनीता हसनंदानी आणि तिचा पती रोहित रेड्डी यांनी 9 फेब्रुवारी रोजी आपल्या बाळाचं स्वागत केलं. पुत्ररत्नाच्या प्राप्तीनंतर दोघांनीही आनंद व्यक्त केला. रोहित रेड्डी यांनं आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून याची माहिती दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या