लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच बॉलीवूड अभिनेत्रीचा घटस्फोट

3141

बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्रीने आपला घटस्फोट झाल्याचे जाहीर केले. ट्विटरचा आधार घेत तिने आपण नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचे आणि हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतल्याचे जाहीर केले आहे. गेल्या वर्षी 13 डिसेंबरला पुण्यामध्ये या अभिनेत्रीचे लग्न झाले होते.

shweta-basu-prasad-good-ima

मकडी, बद्रीनाथ की दुल्हनिया सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी श्वेता बासू प्रसाद हिचे लग्न चित्रपट निर्माता रोहित मित्तल याच्याशी झाले होते. लग्नापूर्वी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. श्वेताने ट्विटरवर लिहिले आहे की काही महिन्यांपूर्वी आम्ही या मतापर्यंत पोहोचलो होतो की आता वेगळं होणं चांगले आहे. ट्विटरवर लिहिलेल्या संदेशाच्या शेवटी श्वेताने लिहिले आहे की ‘चांगल्या आठवणींसाठी रोहित तुझे आभार मानते, तुझ्या पुढच्या आय़ुष्यासाठी शुभेच्छा.’ रोहित मित्तल यानेही हा संदेश इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याने याला नवी सुरुवात असे शीर्षक दिले आहे. गेल्या वर्षी श्वेता आणि रोहित यांचे लग्न बंगाली आणि मारवाडी अशा संमिश्र पद्धतीने झाले होते. या दोघांची भेट अनुराग कश्यप याच्या निर्मितीगृहात झाली होती. तिथे श्वेता ही कथा सल्लागार म्हणून काम पाहात होती तर रोहित निर्माता होण्याचे अनुराग कश्यपकडून धडे गिरवत होता.

श्वेता बसू हिचे नाव 2014 च्या एका सेक्स स्कँडलमध्ये आले होते. तिच्यावर अत्यंत गलिच्छ आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात नाव आल्यानंतर श्वेता सुटकागृहात पाठवण्यात आले होते. आणि दोन महिने तिला तिथेच रहावं लागलं होतं. या प्रकरणी तिला तुरुंगातही जावं लागलं होतं. आपण निर्दोष असल्याचं श्वेता सुरुवातीपासून सांगत होती. हैदराबाद सत्र न्यायालयाने तिला क्लीन चिट दिल्यानंतर तिच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसला गेला. श्वेताने मर्द को दर्द नही होता या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तिने वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेल्या बद्रीनाथ की दुल्हनियामध्येही काम केलं होतं. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ताश्कंद फाईल्समध्ये तिला महत्वाची भूमिका मिळाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या