कोरोनाचा विषाणू माझ्या शरीरात पार्टी करतोय हे कळालेच नाही! कंगना राणावत

कोरोना लाटेने बॉलिवूडलाही आपल्या कवेत घेतले असून एकापाठोपाठ एक कलाकार पॉझिटिव्ह होत आहेत. आता अभिनेत्री कंगणा राणावत हिला कोरोनाची लागण झाली आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली.

मागील काही दिवसांपासून थकवा आणि कमजोरी जाणवत होती, तसेच डोळ्यातही जळजळ होत होती. यामुळे मी हिमाचल प्रदेशला जाण्याचा विचार केला, मात्र तत्पूर्वी मी कोरोना चाचणी केली आणि मला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे, अशी माहिती कंगनाने दिली.

तसेच कोरोना विषाणू माझ्या शरीरात पार्टी करतोय याचा अंदाज मला आला नाही. आता मला याची माहिती मिळाली असून मी याचा खात्मा करून टाकेन, अस म्हणत कंगनाने हा एक छोटासा ताप असून याला जास्तच महत्व मिळाले आहे आणि आता तो लोकांना भीती दाखवत आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने याचा खात्मा करूया, असे आवाहनही केले.

ट्विटर अकाउंट सस्पेंड

दरम्यान, ट्विटरने अभिनेत्री कंगना राणावत हिचे अकाऊंट कायमचे बंद केले आहे. भडकाऊ ट्विट्स केल्याबद्दल ट्विटरने ही कारवाई केली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीसंदर्भात कंगनाने आक्षेपार्ह ट्विट्स केली होती. ममता बॅनर्जींचे धोरण, तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराबद्दल तिने लिहिले होते. या हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असे तिने लिहिले होते.

शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब अडकले कोरोनाच्या विळख्यात, सासू-सासऱ्यांनंतर पती, आई आणि मुलांनाही लागण

कंगनाची प्रतिक्रिया

दरम्यान, कंगनाने यावर प्रतिक्रिया देताना ‘तपकिरी लोकांना गुलाम बनवण्याची अमेरिकन लोकांची मानसिकता असते असे माझे म्हणणे ट्विटरने पुन्हा एकदा सिद्ध केले.’ असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या