… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला ‘बिग बजेट’ चित्रपटांना नकार

2345

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या कुटुंबासोबत हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे वेळ घालवत आहे. याच दरम्यान वेळ काढत तिने ‘पिंकव्हीला’ या वेबसाईटला छोटेखानी मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहे. या दरम्यान तिने आपण अनेक बिग बजेट चित्रपट नाकारल्याने सांगितले.

अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चितपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली. हा चितपट मला ऑफर झाला होता असे कंगनाने मुलाखतीत सांगितले. रणबीर कपूर माझ्या घरी या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन आला होता. परंतु माझ्या वाट्याला येणारी भूमिका मला विशेष आवडली नाही, कारण त्यामध्ये मला काही करण्यासारखे नव्हतेच. त्यामुळे की त्याला नकार दिला, असे कंगना हिने सांगितले. रणबीर कपूरला एखादा नाही कसा म्हणू शकतो? असा विचार तुमच्या मनात येईल, परंतु मी जे चितपट केले त्यामुळे नाही, तर मी जे चित्रपट नाकारले त्यामुळे मी इंडस्ट्रीत आहे, असेही ती म्हणाली.

‘संजू’सह सलमान खान याची प्रमुख भूमिका असणारा ‘सुल्तान’ या चित्रपटाचा प्रस्तावही कंगनाला आला होता. मला सुल्तान चित्रपटाची ऑफर होती, मात्र मी नकार दिला. मी नकार दिल्यानंतर आदित्य चोप्रा याने मला फोन केला आणि तुझ्यासोबत कधीही काम करणार नाही असे म्हटले, असेही कंगनाने सांगितले.

मधुबालाची भूमिका ‘ड्रीमरोल’
मुलाखतीत कंगनाने आपल्या ड्रीमरोलबाबत माहिती दिली. मी नेहमीच मधुबाला यांची चाहती राहिली आहे. मला पडद्यावर त्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर मी नाही म्हणू शकणार नाही. तसेच माझ्या अपॉझिट अमीर खान याला घेण्यात यावे अशी इच्छाही तिने बोलून दाखवली. अनुराग बसू याने किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये मला मधुबाला यांची भूमिका ऑफर केली होती, मात्र तो चित्रपट शूट झाला नाही. या चित्रपटात रणबीर कपूर किशोर कुमार यांनी भूमिका साकारणार होता. तो चित्रपट काही कारणास्तव लटकला. परंतु संधी मिळाल्यास मला मधुबाला यांची भूमिका साकारण्यास आवडेल, असे कंगनाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या