अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीला शिवी दिली म्हणाली…..***k off

5114

सध्या सर्वत्र कोरोनामुळे वातावरण दहशतीचं बनलं आहे. देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ झालेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रामायण मालिकेवरून चर्चेत आलेल्या एका अभिनेत्रीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तिला ट्रोल करणाऱ्या दुसऱ्या अभिनेत्रीला शिवी दिली आहे.

ही अभिनेत्री म्हणजे कविता कौशिक असून ती काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. तिने रामायण या मालिकेच्या पुनःप्रक्षेपणावर टीका केली होती. त्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलं होतं. या दरम्यान वादग्रस्त विधानं करून त्यासाठी तुरुंगाची हवा खाऊन आलेली अभिनेत्री पायल रोहतगी हिनेही एक व्हिडीओ व्हायरल करून कविताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ लॉकडाऊन परिस्थितीत पोलिसांना उगाच फोन करून मदत मागणाऱ्या एका तरुणाचा होता. तो व्हिडीओ पोस्ट करून पायलने नाव न घेता कवितावर टीका केली.

पायल म्हणाली की, ”(व्हिडीओतील तरुणाला उद्देशून) ही कुणी आयुष्याला वैतागलेली आणि कामधंदा नसलेली, एफआयआर नावाच्या एका मालिकेत काम करणारी अभिनेत्री आहे.. काय नाव तिचं? तुला काही काम नसेल तर तिच्याकडून अभिनय शिक. ती तुला प्रेमाने मिठी मारेल. मग कोरोना का झालेला असेना, पण मानवतेच्या नावाखाली ती तुला मिठी मारेल. तू 100 नंबरवर फोन करू नकोस, तिला फोन कर”, असं ट्वीट पायलने केलं.

ते ट्वीट पाहून संतापलेल्या कविताने तिला उत्तर दिलं. ती म्हणाली, ”माझं नाव लिहून ठेव पायल. मी माझ्या नावाचा ब्रँड बनवला आहे. त्याला ओळखण्यासाठी नावाचीसुद्धा गरज नाही. पण तुझं काय? तू एक चांगली अभिनेत्रीही नाहीस आणि चांगली माणूससुद्धा. तुझ्याकडून एखादा माणूस फक्त द्वेषच शिकू शकतो. मी यापूर्वी तुला रिप्लाय केला नाही, कारण तू माझ्यासाठी तितकी महत्त्वाची नाहीस. त्यामुळे ***k off.” असं संतापाने लिहिताना कविताने पायलला शिवी दिली. या ट्वीटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी कविता कौशिक हिने रामायण मालिकेचं पुनःप्रक्षेपण करण्यावरून टीका केली होती. स्वतः संसदेत पॉर्न बघता, मग आम्ही रामायण का बघाव असं आक्षेपार्ह विधान तिने केलं होतं. तिच्या या विधानावर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या