चित्रपट निर्मात्याने व्हॅनिटीमध्ये केले गैरवर्तन, अभिनेत्रीचा गंभीर आरोप

अभिनेत्री मंदना करिमी हिने तिचा आगामी चित्रपट कोकाकोलाचे निर्माते महेंद्र धारिवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेंद्र धारिवाल यांनी चित्रपटाच्या सेटवर आपल्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप मंदनाने केला आहे. मंदनाच्या या आरोपावर महेंद्र धारिवाल यांनीदेखील मौन सोडले असून मंदना अनप्रोफेशनल आहे खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.

”महेंद्र धारिवाल है अहंकारी असून ते अत्यंत जुन्या विचाराचे आहेत त्यांनी सेटवरील वातावरण पुरुष प्रधान केलेले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या ठिकाणी काम करण्यास मला त्रास झाला. हा क्रु प्रोफेशनल देखील नव्हता तरीदेखील मी या चित्रपटासाठी वर्षभर काम केले. शूटींगचे शेवटचे दोन दिवस उरलेले होते. मी सेटवर वेळेत जात असताना देखील मला प्रोड्युसरने आणखी तासभर थांबण्यास सांगितले मी त्याला नकार दिला. त्यावेळी प्रोड्यूसर माझ्या वॅनिटी मध्ये आला व माझ्यावर जोरात ओरडू लागला. तिथे स्टायलिस्ट उपस्थित होता त्याने प्रोड्यूसरला बाहेर जायला सांगितले. पण तरीही प्रोड्युसर व त्याचा मुलगा माझ्यावर ओरडत होते. आम्ही तुला तुला पैसे दिले आहेत तुला काम पण नाही करायचं आणि पैसे पण पूर्ण हवेत. तुला मला ब्लॅकमेल करायचा आहे का? अशी भयंकर आरडाओरड धारिवाल यांनी केली”, असा आरोप धारिवाल यांनी केला आहे.

निर्माते धारिवाल यांनी मंदनाला अनप्रोफेशनल म्हटले असून शूटिंगमध्ये ती कायम नखरे करत असायची असा आरोप केला आहे. ”लॉक डाऊनच्याआधी मंदना सोबत लाख रुपयांचा करार केला होता. लॉकडाऊनच्या आधी काही सीन शूट झाले. मात्र नंतर जेव्हा पुन्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा मंदना नखरे करू लागली. तिने दिल्लीत एक दिवस शूटिंगसाठी थांबण्यासाठी चक्क दोन लाख रुपये मागितले. 13 नोव्हेंबरला देखील मंदनाची शिफ्ट सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी होती मात्र तरीही मला सात वाजता जायचे जायचे असा हट्ट तिने धरलेला’, असा आरोप धारिवाल यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या