बोल्ड मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेने गुपचूप उरकले लग्न, फोटो व्हायरल

2818

बोल्ड मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडे हिने गुपचूप लग्न उरकून घेतले आहे. पूनमने प्रियकर सॅम यांच्यासोबत विवाह केला आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत तिने याचा खुलासा केला आणि चाहत्यांना सरप्राईज दिले. यानंतर सोशल मीडियावर फक्त तिच्या लग्नाचीच चर्चा पाहायला मिळाली.

जीवनातील या महत्त्वाच्या आणि आनंदाच्या क्षणी पूनम आणि सॅम यांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. पूनम निळ्या रंगांच्या लेहंगा, चोळीत दिसत असून याला गुलाबी आणि पांढऱ्या रंगांची एम्ब्रॉयडरी केल्याचे दिसते. तर सॅमने निळ्या रंगांची शेरवानी परिधान केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोसोबत पूनमने ‘पुढील सात जन्म तुझ्यासोबत व्यतीत करायची आहेत’, असे कॅप्शन दिले आहे. याला सॅमने कमेंट करत, ‘हो, मिसेस बॉम्बे’ असे म्हटले आहे.

screenshot_2020-09-11-19-44-52-152_com-android-chrome

पूनम आणि सॅम यांनी आपले नाते कधीही लपवून ठेवले नाही. सार्वजनिक ठिकाणी ते दोघे एकत्र फिरताना दिसत होते. पूनम अनेकदा सॅमसोबत फोटो, व्हिडीओ शेअर करत होती.

screenshot_2020-09-11-19-45-01-519_com-android-chrome

दरम्यान, पूनमने ‘नशा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात काही विशेष चमक दाखवू न शकलेली पूनम बोल्ड फोटो आणि वादग्रस्त विधानांनी जास्त चर्चेत राहिली. ‘2011 चा वर्ल्डकप जिंकल्यास मी विवस्त्र होईल’ या विधानाने ती जास्तच चर्चेत आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या