अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर केले लैंगिक शोषणाचे आरोप

anurag-kashyap-ani

दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने ट्विटरद्वारे केला आहे. तसेच या ट्विटमुळे आपल्या जिवाला धोका असून आपली मदत करण्याची विनंती तिने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी अनुराग यांना कामानिमित्त भेटायला त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी एका रुममध्ये नेऊन त्यांनी माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पायलने केला आहे. तसेच या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, जेणेकरून त्याचे खरे रूप जगासमोर येईल असेही तिने म्हटले आहे. दरम्यान, पायलने केलेले सर्व आरोप अनुराग यांनी धुडकावले असून ‘थोडी तरी मर्यादा बाळगा’ अशा शब्दांत तिला सुनावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या