मला काळी मांजर म्हणायचे! प्रियांका चोप्राने उघड केले चित्रपटसृष्टीतील कटू सत्य

आज जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवलेली प्रियांका चोप्रा हिलाही कधीकाळी तिच्या रंगावरून टीका सहन करावी लागली आहे. ती अमेरिकेत असताना तिच्या रंगावर टिप्पणी केली गेली होती.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही एक प्रसिद्ध नाव बनले आहे. प्रियांकाने जागतिक स्टार म्हणून तिची ओळख निर्माण केली आहे. आता देशातच नाही तर परदेशातही तिचे प्रचंड चाहते आहेत यात शंका नाही. आज लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या प्रियांका चोप्रालाही तिच्या रंगावरून बॉडी शेमिंग आणि भेदभावाचा सामना करावा लागला. चित्रपट सृष्टीत आलेल्या वाईट अनुभवाचा प्रियंकाने खुलासा केला आहे.

प्रियंका चोप्रा जोनासने अलीकडेच बीबीसीच्या ‘100 महिलांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. प्रियांका ही 2022 मधील सर्वात प्रभावशाली महिला बनली आहे. यावेळी बीबीसीशी संवाद साधत तिने चित्रपटसृष्टीत तिच्यासोबत झालेल्या वर्णभेदाचा खुलासा केला.

प्रियांकाने सांगितले की सुरुवातीला ‘मला काळी मांजर आणि डस्की म्हटले जायचे. तेही अशा देशात जिथे प्रत्येकजण सावळा आहे. त्यामुळे मी सुंदर नाही असे मला वाटू लागले होते. मला असे वाटायचे की मला इतरांपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल, परंतु माझा असा विश्वास होता की मी इतर अभिनेत्यांपेक्षा अधिक प्रतिभावान आहे. मला अनेकदा सेटवर तासनतास थांबावं लागलं आणि मला मानधन देखील पुरुष कलाकारांच्या तुलनेत कमी होतं.

प्रियांका चोप्राने 2002 मध्ये तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. थज्मिझान या तमिळ चित्रपटातून तिने पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली. तिने अनेकदा स्वतःसाठी आव्हानात्मक भूमिका निवडल्या आणि आपल्या चमकदार कामगिरीने देशातच नाही तर परदेशातही नाव कमावले. पण, बॉलीवूडमध्ये आलेले कटू अनुभव ही अभिनेत्री आजही विसरू शकलेली नाही.