अभिनेत्री रश्मिका मंदाना परळीत एका कार्यक्रमानिमित्त आली होती. तेव्हा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली आहे. मुंडे राज्याचे असंवेदनशील मंत्री असून शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली आहे.
परळीत धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या वैद्यनाथ गणेश महोत्सवात रश्मिकाने हजेरी लावली. यावर एक्सवर पोस्ट लिहून वडेट्टीवार म्हणाले की, ‘कृषीप्रधान महाराष्ट्राचे असंवेदनशील कृषिमंत्री‘ ‘कृषीप्रधान महाराष्ट्राचे असंवेदनशील कृषिमंत्री‘ केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरा करून तात्काळ ३४४८ कोटींची या राज्यांना मदतीची घोषणा केली आहे. इकडे आपल्या राज्यात कृषी मंत्री सिनेतारका बरोबर व्यस्त आहेत.
चार दिवसांपूर्वी मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथील शेतकऱ्याचा हंबरडा फोडून रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता. अतिवृष्टीमुळे मराठवाडयातील हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबात ऐन सणासुदीच्या काळात नैराश्य आहे.
अश्या स्थितीत राज्याचे कृषिमंत्री करोडो रुपये उधळून रश्मिका मंदना- क्रीती सेनन यांसारख्या महागड्या सिनेतारका आपल्या कार्यक्रमात बोलावून आनंद घेत आहे.
सरकारच्या मदतीची आस लावून शेतकरी बसला आहे, केंद्र सरकारचे पथक साधे पाहणी करायला आलेले नाही. पण याचा पाठपुरावा करणार कोण? राज्य सरकारला शेतकऱ्यांचे सवाल आहे.
तसेच केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कधी येणार?
केंद्रीय कृषी मंत्री नाही तर केंद्रीय पथक तरी मराठवाड्याचे झालेले नुकसान पाहायला येणार का?महाराष्ट्राला केंद्राची मदत मिळणार की नाही?
मुख्यमंत्री ,दोन उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील मंत्र्यांशी चर्चा केली का? असे प्रश्न उपस्थित करत राज्याचे कृषीमंत्री सिनेतारकांसोबत नृत्य करण्यात व्यस्त आहेत. महायुतीचे सरकार किती ढोंगी आहे आणि बळीराजा बाबत ते किती संवेदनशील आहेत हे यातून स्पष्ट होते असेही वडेट्टीवार म्हणाले.
‘कृषीप्रधान महाराष्ट्राचे असंवेदनशील कृषिमंत्री‘
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरा करून तात्काळ ३४४८ कोटींची या राज्यांना मदतीची घोषणा केली आहे.
इकडे आपल्या राज्यात कृषी मंत्री सिनेतारका बरोबर व्यस्त आहेत.
चार दिवसांपूर्वी… pic.twitter.com/WUwJTVyNZZ
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 8, 2024