Photo – ‘रोज फालूदा’ दिसतेय! रुबिनाच्या अंदावर नेटकरी फिदा

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक ही लवकरच मोठा पडद्यावरही दिसणार आहे. ‘अर्थ’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रुबिनाच्या पदार्पणाची चर्चा सुरू असतानाच तिने केलेले एक फोटोशूटही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

rubina-dilaik-4

रुबिनाने या फोटोंमध्ये रफल स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातलेला आहे. यात ती खुपच सुंदर दिसत असून तिचे कौतुकही होत आहे.

rubina-dilaik-3

चाहते तिच्या अंदावर फिदा झाले असून एकाने तर तू या ड्रेसमध्ये एकदम सिंड्रेला दिसतेय, असे म्हटले. तर काहींनी तिला ‘बार्बी डॉल’ अशीही उपमा दिली.

rubina-dilaik1

या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले ते जान कुमार सानू याने. त्याने रुबिनाच्या फोटोंवर ‘रोज फालूदा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

rubina-dilaik-2

दरम्यान, रुबिना लवकरच पती अभिनव शुक्लासोबत एका म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे. यासह ती ‘अर्थ’ चित्रपटातही महत्वाची भूमिकेत दिसेल.

आपली प्रतिक्रिया द्या