एका अभिनेत्रीने केली आत्महत्या, लोकांनी श्रद्धांजली वाहिली भलतीलाच

1222

दोन दिवसांपूर्वी ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेजल शर्माच्या आत्महत्येच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दाखविल्या गेल्या. मात्र यातील काही प्रसारमाध्यमांनी ज्या सेजल शर्माने आत्महत्या केली तिच्या ऐवजी अभिनेत्री Sezal sharma (सेझल) चे फोटो वापरले. त्यामुळे अनेकांनी आत्महत्या केलेल्या सेजलच्या ऐवजी सेझलला श्रद्धांजली वाहिली. यामुळे सेझल संतापली असून तिने ट्विट करत मी आत्महत्या केला नसल्याचा खुलासा केला आहे.

सेझल शर्मा हिला तिच्या सोशल अकाऊंटवरून श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच तिच्या कुटुंबीयांना तसे संदेशही येत आहे. त्यामुळे सेझलने सोशल मीडियावरून ती जिवंत असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांना फटकारले आहे. “माझ्या सर्व मित्रांना व चाहत्यांना सांगू इच्छिते की, मी जिवंत आहे. मी अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येमुळे दु:खी आहे. मात्र माध्यमांनी माझ्या फोटोचा वापर करणे हे अत्यंत बेजबाबदार पणाचे आहे. यामुळे माझ्या नातेवाईकांमध्ये भीती पसरली होती.” असे ट्विट तिने केले होते.

एकाच महिन्यात सेजल शर्मा व कुशल पंजाबी या दोन कलाकारांनी आत्महत्या केल्याने टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. काम मिळत नसल्यानेच या दोघांनीही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिल तो हॅप्पी है जी या मालिकेत सेजलने मुख्य अभिनेता अंशच्या दत्तक बहिणीची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तिने व्हिवो फोनच्या जाहिरातीत आमीर खानसोबत व उषा फॅनच्या जाहिरातीत रोहित शर्माा व हार्दिक पांड्यासोबत काम केले होते. तिने आजाद परिंदे नावच्या एका वेबसिरीजमध्येही काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या