बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ वामन हरी पेठे ज्वेलर्सची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. मुंबईतील फिनिक्स मार्पेट सिटी येथील 27व्या शोरुमचे उद्घाटन शर्वरी वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विभा कलेक्शन लॉँच करण्यात आले. हे कलेक्शन म्हणजे पारंपरिक जोंधळे माळ यांचा एक आधुनिक ट्विस्ट आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या कुटुंबाचा भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, वामन हरी पेठे ज्वेलर्स आजपर्यंत आम्हाला पारंपरिक मराठी आणि आधुनिक दागिने देत आले आहेत. त्यामुळे ते प्रत्येक महिलेचा विश्वासार्ह ब्रँड बनले आहेत, अशी प्रतिक्रिया शर्वरी वाघ यांनी या वेळी दिली.