सोनालीच्या वाढदिवशीच चाहत्यांना गोड सरप्राईज, साखरपुड्याचे फोटो व्हायरल!

2740

मराठी चित्रपटसृष्टीतली अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 18 मे रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. या दिवशी पीपीई कीट्सचं वाटप करून तिने संवेदनशीलतेचं दर्शन तर दिलंच आहे. पण, त्याखेरीज आज तिच्या चाहत्यांना एक गोड सरप्राईजही मिळालं आहे.

सोनालीने तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा तिने केली आहे. काही काळापूर्वी कुणाल बेनोडेकर याच्याशी तिचं लग्न होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, कोणतीही तारीख सोनालीने जाहीर केली नव्हती. पण, फेब्रुवारी महिन्यातच तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा तिने केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. माझ्या पार्टनरसोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात करतेय.. चढ-उतार आणि साहसासाठी सज्ज आहे, असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्या पोस्टमध्ये तिने कुणालला टॅगही केलं होतं. तेव्हापासून तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता साखरपुडा झाल्याची बातमी देऊन सोनालीने चाहत्यांना गोड धक्का दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या