‘या’ अभिनेत्रीला चाहत्याने पाठवले अश्लिल मेसेज

24

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सोनी सिंग हीला तिचा एक चाहता सोशल मीडियावरून अश्लील मेसेज पाठवत आहे. मार्टिन इस्टिव्ह असे त्या मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याला सोनीने तिच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स वर ब्लॉक केले आहे मात्र सदर व्यक्ती तरिही तिला वेगवेगळ्या अकाऊंट्सवरून अश्लिल मेसेज पाठवून त्रास देत असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. याप्रकरणी अद्याप सोनीने तक्रार दाखल केली नसली तरी ती लवकरच तक्रार दाखल करणार आहे.

soni-singh-nbe

‘अभिनेत्री असल्यामुळे मी लोकांसोबत स्वत:ला जोडून ठेवण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते मात्र याचा काही लोकं फायदा घेतात. मार्टीन नावाचा एक तरुण मला सोशल मीडियावरून अश्लील मेसेज पाठवत आहे. त्याला मी ब्लॉक केले आहे मात्र तरिही तो वेगवेगळ्या अकाऊंटवरून मेसेज पाठवतो. तसेच त्याला ब्लॉक केल्याचे परिणामही चांगले होणार नाहीत असे धमकीचे मेसेज देखील त्याने पाठवले आहेत’ असे सोनीने प्रसारमाध्यमांना सांगितले.

सोनी सिंग हीने तुम्हारी दिशा, घर की लक्ष्मी बेटियाँ, मन की आवाज, प्रतिज्ञा, सुमीत संभाल लेगा, आणि नामकरण अशा मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्येही सहभागी झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या