पाहा यांना आपण मत दिलं आहे, स्वरा भास्करची टीका

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आजच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळा व कुस्ती पटूवर झालेल्या कारवाई वरून अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केंद्र सरकारवर टीका केली आहे. स्वराने ट्विटर वरून फोटो शेअर करत तिने सरकारला फटकारले.

स्वराने शेअर केलेल्या फोटोत एक फोटो हा संसद उद्घाटन सोहळ्याचा आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व साधू संतासोबत उभे आहेत. तर दुसऱ्या फोटोत पोलीस कुस्तीपटू ना फरफटत नेत आहेत. यावरून स्वराने ट्विट केले आहे. त्या सोबत “हे बघा इंडिया, आपण यांना मत दिलं आहे” असे पोस्ट केले आहे