Photo – लिलिअ‍ॅक शरारामध्ये तृप्ती दिसते तोबा तोबा…

अ‍ॅनिमल सिनेमा फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या अभिनयासोबतच सौदर्यांमुळेदेखील कायम चर्चेत असते. तृप्तीने ओटीटी असो किंवा चित्रपट असो तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भूरळ पाडली आहे. नुकताच 2018 मधील तृप्ती डिमरी व अविनाश तिवारी यांचा ‘लैला मजनू’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या मागणीमुळे पुर्न प्रदर्शित करण्यात आला. या निमित्ताने तृप्तीने केलेल्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने लिलिअॅक रंगाचा शरारा परिधान केला असून ऑक्सिडाइझ्ड झुमके आणि बांगड्या घातल्या आहेत. हा शरारा हाऊस ऑफ मसाबाचा असून याची किंमत जवळपास 35 हजार इतकी आहे.