रोगमुक्त चिखली संकल्पना अ‍ॅड. विजय कोठारींनी ‘महाआरोग्य शिबीरा’च्या माध्यमातून साकारली – संजय कुटे

348

राजेश देशमाने । चिखली (जि. बुलढाणा)

रोगमुक्त चिखली विधानसभा मतदार संघ असावा या उदात्त हतूने अ‍ॅड. विजय कोठारी यांनी सर्वसामान्य गरीब गरजु रुग्णांसाठी हे महाशिबीर चिखली येथे आयोजीत करुन खर्‍या अर्थाने ‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद खरे ठरविले आहे असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले आहे.

चिखली येथे भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी यांनी आयोजीत केलेल्या भाऊसाहेब फुंडकर जनआरोग्य महाशिबीर आदर्श विद्यालय परिसरात आज रविवारला आयोजीत केले होते. या महाशिबीराच्या उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री ना.डॉ. संजय कुटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ वैधानीक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री ना. रणजीत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सागर फुंडकर, चिखली नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, चिखली अर्बन बँक अध्यक्ष सतीश गुप्ता, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेशआप्पा खबुतरे, संजय चेके पाटील, डॉ.प्रतापसिंग राजपूत, सुधाकर काळे, देविदास जाधव, पंडीतराव देशमुख व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कामगार मंत्री डॉ. संजय कुटे पुढे म्हणाले स्व. भाऊसाहेब फुंडकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना जिल्ह्यातील गोर-गरीब जनतेसाठी महाआरोग्य शिबीर घेण्याचा त्यांचा संकल्प होता. परंतु मधेच ते आपल्याला सोडून गेलेत त्यातुळे त्यांचे आरोग्य महावेळावा घेण्याचे स्वप्न शेगाव नंतर चिखली येथे अ‍ॅड. विजय कोठारी यांनी पुर्णत्वास नेण्यासाठी गावा-गावात जाऊन 65000 रुग्णांची गेली पंधरा दिवस डॉक्टरांच्या चमुद्वारे तपासणी करुन आवश्यकतेनुसार आज या महाआरोग्य शिबीरात 25000 रुग्णांना बोलावून राज्यातील दिडशे तज्ञ डॉक्टरांमार्फत पुनर्तपासणी करुन औषधोपचार केले. काही रुग्णांना ऑपरेशन करिता मुंबई, पुणे, संभाजीनगर येथील उपचाराकरिता मदत करणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थ्यांने सर्वसामान्य लोकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविली आहे. राज्यशासन सुद्धा 90 टक्के जनतेला आरोग्याच्या विविध योजनेद्वारे अर्थसहाय्य करित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान भारत या योजनेत जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याहत्तर हजार रुग्ण बसले असुन त्यापैकी पन्नास टक्के रुग्णांना कार्डचे वाटपदेखील झाले आहे. चिखलीमध्ये भाजपाची ताकद मोठी आहे ती ताकद एका ठिकाणी आणुया व सर्वांनी एकजुट होऊन काम करुया असा मंत्र देखील चिखली विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्‍यांना दिला. यावेळी गृहराज्यमंत्री ना. रजणजीत पाटील यांनी आपल्या भाषणात अ‍ॅड. विजय कोठारी यांनी घराघरापर्यंत जाऊन आरोग्यसेवा पोहचविल्याबद्दल कौतुक करुन आजचे हे महाआरोग्य शिबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे स्वप्न साकार करणारे ठरले आहे. यावेळी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनीदेखील आपल्या भाषणात या महाशिबीर आयोजनाचे कौतुक केले. तर आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी आपल्या भाषणात येथे स्व. भाऊसाहेबांच्या कल्पनेतील महाशिबीर चिखली येथे आयोजीत करुन भाऊसाहेबांचे स्वप्न साकार केले असल्याचे सांगुन चिखली विधानसभा मतदार संघातील रेकॉर्डब्रेक असे आरोग्य महाशिबीर झाले असल्याची कबुली आपल्या भाषणातून दिली. तर खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात अनेक ग्रामिण भागातील कुटुंब रुग्ण पैशांअभावी आजार अंगावर काढतात, आजाराकडे दुर्लक्ष करतात परंतु अ‍ॅड. विजय कोठारी यांनी गरीब गरजु रुग्णांसाठी मुंबई-पुण्याच्या तज्ञ डॉक्टरांना चिखली येथे बोलावून या महाशिबीराच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध करुन दिल्या बद्दल कौतूक केले. तर यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष धृपतराव सावळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रास्ताविकात अ‍ॅड. विजय कोठारी यांनी आपली या शिबीरामागची संकल्पना व्यक्त करतांना म्हणाले स्व. भाऊसाहेब फुंडकर आणि माझे गेल्या तीस वर्षांपासून राजकिय व जिव्हाळ्याचे संबंध होते. ते माझे राजकिय गुरु होते. भाऊसाहेबांची चिखली येथे महाआरोग्यशिबीर घेण्याची इच्छा मी पुर्ण करुन त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला आहे. चिखली विधानसभा मतदार संघात 29 जुलै पासून प्रत्येक गावात पूर्वतपासणी शिबीरे घेऊन आज हे महाआरोग्य शिबीर घेतले आहे. पुर्व तपासणी शिबीरात प्रत्येकांच्या गावात तसेच घरापर्यंत जाऊन आरोग्य सेवा देण्यामागचा माझा हा संकल्प होता. पुर्व आरोग्य तपासणीला 65 हजार तर आजच्या महाआरोग्य शिबीरामध्ये 25 हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. याशिबीरामंध्ये दहा हजार रुग्णांना चष्मे वाटप व इतर रुग्णांना औषधोपचार देखील केले आहे.

महाराष्ट्र कौंसिल ऑफ इंडियन मेडीसीनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता व डॉ. सौरभ कोठारी यांनी हे महाशिबीर आयोजनामागे गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले तयारीची माहिती देऊन या महाआरोग्य मेळाव्यासाठी मुंबई-पुणे सारख्या महानगरातील दीडशे डॉक्टरांनी आज सेवा दिली आहे. तर चिखली शहरातील व डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टरांनी गेली दहा दिवस चिखली मतदार संघातील गावागावात जाऊन आरोग्य पुर्वतपासणी करुन एक्स-रे, इसिजी, पॅथॉलॉजी चाचण्या पूर्ण केले आहे. शेगाव नंतर चिखली येथे आजचे यशस्वी आयोजन केले आहे असे सांगून या महाआरोग्य शिबीरामागची संकल्पना व्यक्त केली.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र कौंसील ऑफ इंडियन मेडीसीनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, डॉ, सौरभ कोठारी, यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळ, अंबीका अर्बन, चिखली अर्बन बँक तसेच गावागावातील भाजपाचे बुथप्रमुखापासून ते भाजपाच्या सर्व नेत्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. या महाशिबीरात आलेल्या रुग्णांसाठी जेवन, पाणी पाऊच याची व्यवस्था केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या