दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष पदावरून मनोज तिवारींची उचलबांगडी, आदेश गुप्तांकडे पदभार

1187

दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष पदावरून मनोज तिवारी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी आदेश गुप्ता यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली आहे. दिल्ली निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणूक खासदार मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. परंतु दिल्लीत भाजपला पुन्हा मोठा पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर मनोज तिवारी यांनी पराभवाची जवाबदारी स्विकारत भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला होता. तेव्हा नड्डा यांनी तो राजीनामा स्विकारला नाही.


नुकतंच मनोज तिवारी यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करत क्रिकेट खेळायला गेले होते, त्याचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तसेच कोरोनाचे संकट हाताळण्यात केजरीवाल सरकारला अपयश आल्याचे सांगत त्यांनी राजघाटावर आंदोलनही केले होते. आता त्यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करून ही जवाबदारी आदेश गुप्ता यांच्याकडे देण्यात आली आहे.

आदेश गुप्ता दिल्लीच्या पटेल नगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. फक्त दिल्लीच नव्हे तर छत्तीसगड आणि मणिपूरमध्येही प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहे. छत्तीसगडची जवाबदारी विष्णूदेव साय तर मणिपूरची जवाबदारी टिकेंद्र सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या