खोदली विहीर, सापडले हजारो आधार कार्ड

39

सामना ऑनलाईन । यवतमाळ

महाराष्ट्रातील खेडेगावात पाण्याची टंचाई असल्यामुळे पाण्यासाठी लोक सतत गावातील विहिरी खोदतात आणि आपली तहान भागवतात. मात्र, यवतमाळमधील एका कोरड्या विहिरीत पाण्याच्या झऱ्याच्या शोधात खणण्याचे काम सुरू असताना पाण्याच्या ऐवजी चक्क हजारो आधारकार्ड सापडले. यामुळे एकच खळबळ उडाली.

पिण्याचे पाणी नसल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील साई मंदिर परिसराजवळ असलेली कोरडी विहीर तेथील काही स्वयंसेवक तरुण खोदत होते. विहीर खोदताना विहिरीतील काहीसा गाळ साफ केल्यानंतर तरुणांना एक गाठोड सापडलं. याच गाठोड्यात हजारो आधारकार्ड मिळाले आहेत.

विहिरीत सापडलेल्या आधारकार्डांची गावकऱ्यांनी तपासणी केली, तेव्हा काही आधारकार्डांची पाणी लागल्यामुळे ओळख पटत नव्हती तर, काही आधारकार्डांची ओळख पटली. ओळख पटलेले आधारकार्ड यवतमाळ जिल्ह्याच्या बाहेर स्थायिक असलेल्या लोहरा गावात राहणाऱ्या लोकांची आहेत. मात्र, इतके आधारकार्ड या विहिरीत कसे? असा प्रश्न तेथील गावकऱ्यांना पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या