कंगना काळी जादू करते असे आरोप करणाऱ्या अध्ययनने आता केला तिला सलाम

1350

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. कंगनाने सुशांतच्या आत्महत्येवरून बॉलिवूडमधील नेपोटिझमवर निशाणा साधला आहे. कंगनाच्या या आरोपांवरून तिचे बॉलिवूडमधील काही कलाकारांसोबत सोशल मीडियावर खटके देखील उडत आहेत. असे असतानाचा कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड व तिच्यावर काळी जादू करते असे आरोप करणारा अभिनेता अध्ययन सुमन याने तिची बाजू घेत तिच्यावर स्तुती सुमनं उधळली आहेत.

‘कंगनाने इंडस्ट्रीमध्ये नाव कमाविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे ती आता एन्जॉय करतेय. ती इंडस्ट्रीतल्या मोठ्या लोकांना टक्कर देतेय. तिने घेतलेल्या मेहनतीसाठी मी तिला सलाम करतो. मी नेहमी सांगत आलोय की आमच्यात काहीही मतभेद असले तरी मी तिचा सन्मान करतो’, असे अध्ययनने एका मुलाखतीत सांगितले आहे.

अध्ययनने बॉलिवूडमध्ये ग्रुपिझमवर टीका केली आहे. ‘नेपोटिझम सर्व क्षेत्रात आहे. पण इथे ग्रुपिझम आणि फेव्हरेटिझम चालते. आपल्या आवडत्या लोकांना संधी दिली जाते.’, असा आरोप अध्ययनने केला आहे. कंगना रनौत व अध्ययन सुमन हे राझ-2 च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्येही होते. मात्र कंगना व अध्ययनचे ब्रेकअप झाल्यानंतर अध्ययनने तिच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. कंगना ही काळू जादू करते असा आरोपही त्याने केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या