‘ही’ अभिनेत्री घेतेय मानसोपचाराचे शिक्षण, करते लोकांचे समुपदेशन

2130

मानसिक आजार ही सध्या जगासमोरची वाढत चाललेली समस्या आहे. अभिनेत्री दीपिका पदूकोणनेही काही दिवसांपूर्वी ती नैराश्यात गेली होती अशी कबूली दिली होती. वाढत चाललेल्या मानसिक आजारांची समस्या लक्षात घेऊन माजी मिसेस वर्ल्ड व अभिनेत्री डॉ. आदिती गोवित्रीकर ही सध्या सायकोलॉजीमध्ये हॉवर्ड विद्यापीठातून मास्टर्सचे शिक्षण घेत आहे. तसेच सोबत ती मेंटल हेल्थ अवेरनेसचे प्रोग्राम देखील आयोजित करत असून ती अनेक कंपन्यांमध्ये याबाबत सुमपदेशन देखील करते.

aditi-govitrikar-new

हिंदुस्थान सध्या हॅपिनेस इंडेक्समध्ये खूप मागे आहे. याचे मुख्य कारण आहे मानसिक आजार, नैराश्य. आपल्या जीवनशैलीने आपण समाधानी नाही. मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी म्हणून मी या बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते तसेच कंपन्यांमध्ये जाऊन जनजागृती व समुपदेशन करते असे आदिती सांगते.

अदिती गोवित्रीकर लवकरच कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूर यांच्यासह “कोई जाने ना” या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार आहे. त्यासोबतच ती हितेन तेजवानी सोबत “ग्रे स्टोरीज” या वेब सिरीज मध्ये देखील दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या