मला बलात्कार प्रकरणात अ़डकवण्याचा कंगनाचा प्रयत्न; आदित्य पांचोलीचा एफआयआर

कंगना रनौतने अभिनेता सुरज पंचोलीवर बलात्काराचा आरोप केला होता.

सामना ऑनलाईन । मुंबई

कंगना रनौत आणि आदित्य पांचोली यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. कंगना आपल्याला बलात्कार प्रकरणात फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आदित्य पांचोलीने करत कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. हे दोघे एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. आदित्य पांचोली यांनी आपले मानसीक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप कंगनाने एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर पांचोली यांनी एफआयआर दाखल केला आहे.

पांचोली यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन कंगना रणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. कंगनाने दाखल केलेल्या तक्रारीविरोधातील हा एफआयआर आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांनी आदित्य पांचोली यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. कंगनाच्या वकिलांनी आपल्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे पांचोली यांनी सांगितले. पांचोली यांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल करून व्हिडिओ आणि फोन रेकॉर्डिंगचे पुरावेही पोलिसांना दिले आहेत.