सय्यद मुश्ताक अली टी- २० स्पर्धा, मुंबईची धुरा आदित्य तरेच्या खांद्यावर

सामना ऑनलाईन । मुंबई

सय्यद मुश्ताक अली टी- २० स्पर्धेतील सुपर लीग सामन्यांकरिता मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली असून आदित्य तरेकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. येत्या २१ जानेवारी पासून कोलकाता शहरात हे सुपर लीग सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी हिंदुस्थानच्या पश्चिम भागातून बडोदा व मुंबई, पूर्व विभागातून बंगाल व झारखंड, उत्तर विभागातून दिल्ली व पंजाब, दक्षिण विभागातून कर्नाटक आणि तमिळनाडू तर केंद्रीय क्षेत्रातून राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांसारखे विविध संघ सुपर लीगसाठी पात्र ठरले आहेत.

कर्णधार आदित्य तरे व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी, सलामीचा फलंदाज जय बिस्ता, अखिल हेरवाडकर, सूर्यकुमार जाधव, सिद्धेश लाडशिवाय काही दिवसांपूर्वी मांडीच्या दुखापतीतून सावरलेल्या श्रेयस अय्यरलाही संघात जागा मिळाली आहे. त्यामुळेच सय्यद मुश्ताक अली टी- २० स्पर्धेतील सुपर लीगमध्ये मुंबईचा संघ कशी कामगीरी बजावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुंबई संघ
आदित्य तरे (कर्णधार), धवल कुलकर्णी (उप-कर्णधार), अखिल हेरवाडकर, जय बिस्ता, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शशांक सिंह, श्रेयस अय्यर, आकाश पारकर, ध्रुमील मातकर, शार्दुल ठाकूर, एकनाथ केरकर, परिक्षीत वाळसंगकर, शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे