आदित्य ठाकरे आजपासून कोकणात; जनआशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू

1340
aaditya-thackeray

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा शनिवारपासून सुरू होत आहे. या टप्प्यात ही यात्रा कोकणात जाणार आहे. या यात्रेचा कार्यक्रम आज पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. 14 ते 17 सप्टेंबरपर्यंत ही यात्रा कोकणात असणार आहे.

  • 14 सप्टेंबर – वेंगुर्ला, कणकवली आणि राजापूर येथे स्वागतसभा तसेच कुडाळ आणि रत्नागिरी येथे विजय संकल्प मेळावा
  • 15 सप्टेंबर – चिपळूण, महाड, कोलाड आणि वडखळ येथे स्वागतसभा तसेच गुहागर, खेड (दापोली) येथे विजय संकल्प मेळावा.
  • 16 सप्टेंबर – पेण, उरण, ऐरोली येथे स्वागतसभा तसेच कर्जत, बेलापूर येथे विजय संकल्प मेळावा.
  • 17 सप्टेंबर – पालघर, विक्रमगड आणि ठाणे येथे स्वागतसभा तसेच नालासोपारा, बोईसर येथे विजय संकल्प मेळावा.
आपली प्रतिक्रिया द्या