आदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार

81

सामना प्रतिनिधी । पाचोरा

शिवसेनेचे नेते तथा युवासेनेचेप्रमुख आदित्य ठाकरे हे 18 जुलै रोजी गुरुवारी लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी व नवीन मतदारांचे मन जिंकण्यासाठी “जन आशिर्वाद यात्रा रथ” आणणार आहेत. जळगांव जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रेची सुरुवात प्रथम पाचोरा येथुन करण्यात येणार आहे. यासाठी संभाजी चौका शेजारील कृष्णाजी नगर येथील प्रांगणात सकाळी 11 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची उपस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याची माहिती पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. गणेश पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अॅड. दिनकर देवरे, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अरुण पाटील, नगरसेवक सतिष चेडे, महेश सोमवंशी, राम केसवानी, दादाभाऊ चौधरी, युवा सेनेचे उपजिल्हाअधिकारी अजय जैस्वाल, अनिकेत सुर्यवंशी, किशोर बारावकर उपस्थित होते.

आदित्य ठाकरे हे सकाळी 11 वाजता जळगांव येथे विमानाने आल्यानंतर पाचोरा येथे सभा घेतील. दुपारी 2.30 वाजता भडगाव येथे जन आशिर्वाद यात्रेचे स्वागत, त्यानंतर पावणेतीन वाजता कासोदा, 3.15 वाजता एरंडोल, 3.45 वाजता धरणगांव येथे विजयी संकल्प मेळावा, सायंकाळी 6 वाजता चोपडा येथे मेळावा, साडेसात वाजता अमळनेर येथे जन आशिर्वाद यात्रा पोहोचणार आहे. त्यानंतर धुळे येथे मुक्काम राहणार आहे.

kishor-patil

पाचोरा येथील जन आशिर्वाद मेळावा यशस्वी होण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी 15 जुलै रोजी भडगांव व पाचोरा येथे शिवसेना आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पाचोरा मतदार संघातुन 1 लाखांपेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित ठेवण्याचे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या