पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रवेशांना स्थगिती द्या!: आदित्य ठाकरे

8

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई विद्यापीठाचा सध्या सुरू असलेला अनागोंदी कारभार बघता पदव्युत्तर पदवी अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशांना स्थगिती द्यावी अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. विद्यापीठाचा आताचा कारभार बघता मागच्या सरकारमधील मंत्री आणि कुलगुरु बरे होते का? असा प्रश्न पडतो कारण तेव्हा विद्यार्थ्यांचं ऐकले जायचे, कुलगुरु भेटत होते पण आता स्वतः राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागला, विद्यापीठावर सु मोटो याचिका दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गेल्या २२ महिन्यांत तब्बल १११ कोटींच्या ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) मुदत संपण्यापूर्वीच मोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठाला आर्थिक चणचण भासत असल्याने या ठेवी मोडण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले. त्यावरून वातावरण तापले आणि विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत याप्रकरणी सीबीआय चौकशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर ताशेरे ओढले. ‘कोणालाही क्लीनचीट न देता विद्यापीठातील मुदत ठेवींबाबत चौकशी करण्यात यावी’ अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पार पाडता येत नाही तरी ऑनलाईन पेपर तपासणीचा अट्टहास कशाला? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

आपली प्रतिक्रिया द्या