तिसऱ्या गुणवत्ता यादीत साधारण घट

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तिसरी गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात आली. पहिली आणि दुसरी यादी नव्वदीपार होती. तिसऱ्या यादीतही साधारण घसरण झाली. या यादीतही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मात्र आता प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागणार आहेत. तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर नवी यादी लागण्याची शक्यता आता कमीच आहे. या यादीतही ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयात जाऊन तेथील रिक्त जागांबद्दल चौकशी करावी लागेल आणि त्यानंतरच तिथे प्रवेशासाठी अर्ज भरता येईल. त्यात विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे.

  • मिठीबाई कॉलेज- कला – 94.80 टक्के, वाणिज्य – 83.85 टक्के, विज्ञान 55.8 टक्के
  • के.सी. कॉलेज-  कला – 93 टक्के, वाणिज्य – 92 टक्के,विज्ञान – 74.15 टक्के
  • वझे केळकर कॉलेज-  कला – 87 टक्के, वाणिज्य – 86.15 टक्के, विज्ञान – 66 टक्के
  • एच.आर. कॉलेज- कला – 85.20 टक्के, वाणिज्य – 92.20 टक्के, विज्ञान – 88.60 टक्के
  • सेंट ऍण्ड्रय़ूज कॉलेज -कला – 82.2 टक्के, वाणिज्य – 69.69 टक्के