मविप्र शिक्षण संस्थेचे संचालक संदीप गुळवे यांनी शनिवारी मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक असलेले संदीप गुळवे हे जिल्हा बँकेचे माजी संचालक आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शिवसेना भवन येथे शनिवारी त्यांच्यासह शिवाजीराव निरगुडे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शिक्षक संघ अध्यक्ष सी. पी. कुशारे, विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष भरत भामरे, एनडीएसटीचे संचालक अरुण पवार, दत्तात्रय आदिक, बाळासाहेब देवरे, किशोर जाधव, दगडू तेलोरे, भाऊसाहेब शिरसाट आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शेकडो शिक्षक उपस्थित होते. शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेते विजय कदम यांनी या सर्वांचे स्वागत केले.
या वेळी नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, योगेश घोलप, निवृत्ती जाधव, संजय इंदुलकर, संजय चव्हाण, मविप्र संचालक प्रवीण जाधव, रमेश पिंगळे, विजय पगार, अमित बोरसे आदी हजर होते.