16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी

5

सामना ऑनलाईन । देहराडून

आयर्लंड व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या टी-20 सामन्यात आज अक्षरश: धावांचा पाऊस पडला. अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज हजरतुल्लाहने 16 षटकार व 11 चौकार ठोकत चक्क 62 चेंडूत 162 धावा केल्या. हजरतुल्लाहच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे अफगाणिस्तानने 20 षटकात 278 धावा केल्या. अफगाणिस्तानचा धावांचा डोंगर गाठताना आयर्लंडची दमछाक झाली व त्यांचा 84 धावांनी पराभव झाला.

प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तानला दोन्ही सलामीवीर उस्मान घनी व हजरतुल्लाह जजईने चांगली सुरुवात करून दिली. हजरतुल्लाह तब्बल 292 च्या स्ट्राईक रेटने 62 चेंडूत 162 धावा करत नाबाद राहिला. त्याने अॅरोन फिंच (156) व ग्लेन मॅक्सवेल(145) यांना मागे टाकत एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. मात्र तो अॅरोन फिंच (175) याचा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड तोडू शकला नाही.