व्हिसासाठीच्या रांगेत चेंगराचेंगरी; 11 महिलांचा मृत्यू

अफगाणिस्तानातून पाकिस्तानला जाण्यासाठीच्या व्हिसासाठीच्या रांगेत भीषण चेंगराचेंगरी होऊन 11 अफगाणी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. शेजारच्या पाकिस्तान देशात जाण्यासाठी नंगरहार येथील पाकिस्तानी दूतावासाच्या व्हिसाकरिता मोठी रांग लागली असताना ही चेंगराचेंगरी झाली.

ज्या महिला मरण पावल्या त्या वयस्कर होत्या. पाकिस्तानचा नंगरहार येथील दूतावास आठ महिन्यांच्या कोरोना निर्बंधानंतर प्रथमच सुरू झाला होता. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्हिसा कामकाजासाठी फुटबॉल मैदानाची जागा निवडली होती. 320 कर्मचारी तेथे तैनात होते, असे नंगरहार प्रांताच्या गव्हर्नरांचे प्रवक्ते अताउल्ला खोगयानी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या