अफगाणिस्तान – राष्ट्रपतींच्या सभास्थळी आत्मघातकी हल्ला, 24 जणांचा मृत्यू

579

अफगाणिस्तानचे (Afghanistan) राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांच्या सभेमध्ये आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे, 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

‘टोलो न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. या हल्ल्याबाबत सरकारी प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. आयईडी (IED) स्फोट असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले आहे. तसेच हा हल्ल्या सभेमध्ये प्रवेश करण्यासाठीच्या गेटवर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सप्टेंबरच्या शेवटी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रपती अशरफ गनी यांची मंगळवारी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेवेळी हल्ला झाला तेव्हा राष्ट्रपतीही त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु या हल्ल्यातून ते बचावले आहे. परंतु सभेसाठी उपस्थित लोकांपैकी 24 जणांना नाहक जीव गमवाला लागला आहे. सभास्थळी महिला आणि मुलांनीही गर्दी केली होती. त्यामुळे मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या