अफगाणिस्तानात तालीबानचा धोका वाढला; राष्ट्रीय महामार्गावर ताबा मिळवण्याचा तालीबानचा प्रयत्न

अफगाणिस्तानातून सुमारे 20 वर्षांनंतर अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्याने अफगाणिस्तानात आता तालीबानचा धोका वाढला आहे. तालीबानचे दहशतवादी पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यासाठी अफगाणिस्तानची लाईफ लाइन असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर ताबा मिळवण्यासाठी तालीबानी दहशतवाद्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर अफगाणिस्तानचे लष्कर सतर्क असून तालीबानकडे राष्ट्रीय महामार्गांचा ताबा जाऊ नये, यासाठी त्यांनी महामार्गावर बंदोबस्त वाढवला आहे.

पाकिस्तान, इराण,ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला अफगाणिस्तानशी जोडणाऱ्या हेरात, कंधार, फरहा,कुंदुज,तखर आणि बदख्शां प्रांतातील मोठ्या महामार्गांवर आणि सीमेवरील सुरक्षा चौक्यांवर तालीबानच्या दहशतवाद्यांनी कब्जा केला आहे. तर नंगरहाल,पक्त्या,पक्तिता, खोस्त आणि निमरोजमध्ये अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने बंदोबस्त वाढवला असून येथील महामार्ग तालीबानच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. काबुलपर्यंत जाणारे महामार्ग ताब्यात घेण्याचा तालीबानचा डाव आहे.

अफगाणिस्तानत राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते ताब्यात घेण्याचा तालीबानच्या दहशतवाद्यांचा डाव आहे. त्यात त्यांना काही प्रमाणात यश आल्याने अफगाीस्तानात आता तालीबानचा धोका वाढला आहे. महत्त्वाचा असणारा कंधार महामार्ग तालीबानच्या ताब्यात गेल्याने दहशतवाद्यांकडून या महामार्गावर सुरक्षा दलावर दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यात येत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ताब्यात घेतल्यानंतर राजधानी काबूल आणि इतर महत्त्वांच्या शहरातील पुरवठा रोखल्यास अफगाणिस्तानवर ताबा मिळवणे तालीबानला सोपे होणार आहे. त्यामुळे तालीबानी दहशतवाद्यांचे लक्ष राष्ट्रीय महामार्ग ताब्यात घेण्याकडे आहे. त्यामुळे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग तालीबानच्या ताब्यात जात असल्याने अफगाणिस्तानमधील तालीबानचा धोका वाढला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या