अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय

683

युवा खेळाडू राशीद खानच्या नेतृत्वात अफगाणिस्तानने सोमवारी इतिहास रचला. यजमान बांगलादेशचा येथे पार पडलेल्या एकमेव कसोटीत 224 धावांनी धुव्वा उडवत अफगाणिस्तानने तिसऱ्याच कसोटीत दुसरा विजय संपादन केला. अशी कामगिरी करणारा अफगाणिस्तान हा ऑस्ट्रेलियानंतरचा दुसराच संघ ठरला हे विशेष. कसोटीत 11 बळी आणि पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या राशीद खानची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या