जुळे नाही, तिळे नाही महिलेने एकाच वेळी दिला 10 मुलांना जन्म; जगातील पहिलीची घटना

जुळी मुलं होणं ही तशी सामान्य बाब आहे. अनेकवेळेला आपण तीन चार मुलं झाल्याचे वृत्तही ऐकले आहे. परंतु एका महिलेने एकाच वेळी 10 मुलांना जन्म दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेतली ही घटना असून 37 वर्षीय महिलेने एकाच वेळी 10 मुलांना जन्म दिल्याचा दावा केला आहे. जगातली ही पहिलीच घटना असून यापूर्वी एका महिलेने 9 मुलांना जन्म दिल्याची घटना नोंद आहे.

दक्षिण आफ्रिकेत गोसियामे थमारा सिथोले या 37 वर्षीय महिलेने 7 मुलगे तर 3 मुलींना जन्म जन्म दिला आहे. 7 जून रोजी गोसियामेला प्रसृतीकळा सुरू झाल्या. तेव्हा तिचा पती टेबेगोने तिला रुग्णालयात दाखल केले. गोसियामे जेव्हा गरोदर होती तेव्हा तिच्या पोटात 6 मुलं आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. परंतु जेव्हा आधुनिक प्रणालीची सोनोग्राफी केली तेव्हा तिच्या पोटात 8 मुलं असल्याचे समोर आलं आणि जेव्हा तिची प्रसृती झाली तेव्हा गोसियामेने 10 मुलांना जन्म दिला आहे. सर्व मुलांची प्रकृती ठीक असून गोसियामेचीही प्रकृती ठणठणीत आहे.  10 मुलं झाल्यानंतर गोसियामे आणि टेबेगो दोघेही खुश आहेत. यापूर्वी माली या आफ्रिकन देशात एका 25 वर्षीय महिलेने 9 मुलांना जन्म दिला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या